Twitter

Follow palashbiswaskl on Twitter

Saturday, September 24, 2011

Fwd: [जाती विरहीत जनआंदोलन] अवघा भारत जेव्हा मुसलमानी राजवट विशेषत: मोगलई...



---------- Forwarded message ----------
From: Bahujan All India <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/9/24
Subject: [जाती विरहीत जनआंदोलन] अवघा भारत जेव्हा मुसलमानी राजवट विशेषत: मोगलई...
To: जाती विरहीत जनआंदोलन <209928362399767@groups.facebook.com>


अवघा भारत जेव्हा मुसलमानी राजवट विशेषत: मोगलई...
Bahujan All India 11:34am Sep 24
अवघा भारत जेव्हा मुसलमानी राजवट विशेषत: मोगलई राजवटीत पिळला जात होता. तेव्हा या महाराष्ट्रात शहाजी राजांचा जन्म झाला. त्यांनी स्वराज्य स्वातंत्र्याचे बीज मराठी मनात रोवले..पुढे शिवाजी महाराजांच्यारुपाने त्या बिजाचा कल्पवृक्ष तयार झाला.

महाराष्ट्राला किंवा संपुर्ण भारताला त्यांनी स्वातंत्र्याची चव काय असते ती दाखवली.त्यांच्या मॄत्यूनंतर संभाजी महाराजांनी स्वातंत्र्यासाठी आणि धर्मासाठी देहाचं बलिदान केले.पण स्वातंत्र्य गमावलं नाही..

मराठ्य़ांचा राजा मेला आता हा दख्खंन आपला होईल हा विचार करत दिल्लीचा सम्राट ऒरंगजेब महाराष्ट्रात ३० वर्ष तळ ठोकून बसला होता.पण महाराष्ट्रावर ताबा मिळवता मिळवता केव्हा त्याची कबर खोदली गेली हे त्यालाही कळलं नाही.

कारण या देशासाठी,स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्रीयन जनतेने दिलेला लढा! राजा गेल्यावरही जनता स्वयंस्फुर्तीने लढतच राहिली..ऒरंगजेब संपला, बाबरापासून चालत आलेले मोगल साम्राज्य संपले, संपुर्ण भारतीय जनतेने स्वातंत्र्य पाहिले (तुकड्यात का होईना)..तरीही महराष्ट्र स्वतंत्रच राहिला.

अब्दाली भारतावर चाल करून आल्यावर त्याला सामोरे या महाराष्ट्रातील पेशवेच गेले. देशाच्या रक्षणासाठी त्या काळात पानिपतात मराठ्यांनी रक्त सांडलं. घरटी कमीत कमी एक माणूस गेलं, अरे गंगाराम तो अब्दाली पेशव्याच्या मृत शरीरात भूसा भरून नेणार होता रे..आजही धुलीवंदनाच्या दिवशी सायंकाळी आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून वीराची मिरवणूक काढली जाते ; त्या पानिपतातल्या लढाईत हौतात्म्य पत्करलेल्या आमच्या पुर्वजाना श्रद्धांजली देण्यासाठी!

पेशवेंचा पाढाव झाल्यावरच इंग्रजांची सत्ता भारतात स्थापन झाली... आणि पेशव्यांच्या रागापोटीच इंग्रजांनी पुण्यातला शनिवारवाडा जाळून टाकला.

१९५७ चे नेतृत्वही महाराष्ट्रानेच केले. राणी लक्ष्मी बाई , तात्या टोपे आणी पेशवे

बंड संपले तरी महाराष्ट्राने हार मानली नाही.!

रामोश्यांचा उठाव, पत्री सरकार स्थापन करणारे क्रांतीसिंह नाना पाटील इथलेच !

वयाच्या शेवटच्या वर्षात 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच " सांगणारे लोकमान्य टिळकही मराठीच!

'ने मजसी मातृभूमीला सागरा प्राण तळमळला' आर्त साद घालत देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग चोखळणारे स्वातंत्र्यवीर सावरकरही इथलेच!

अस्पृश्य निवारणासाठी धडपडणारे शाहु महाराज, देशाला घटना देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरही महाराष्ट्रीयनच!

स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुलेही याच भूमीत जन्माला आले. महर्षि धोंडो केशव कर्वेही इथलेच.

म. गांधीचे गुरु नामदार गोपाळ कृष्ण गोखलेही मराठीच होते.

देशाच्या ५० कोटींसाठी प्रत्यक्ष महात्मा गांधीचा वध करायला न डगमगणारा नथुराम गोडसेही महाराष्ट्रीयनच. (अर्थात गांधी वध की हत्या, वा झाले ते योग्य की अयोग्य या वादात मला आता पडायचे नाही.)

देशाला सर्वात जास्त महसूल मिळवून देणा-या मुंबईतला बहुसंख्य करदाता वर्गही महाराष्ट्रीयनच आहे......

यादी बरीच वाढवता येईल पण राजकीय क्षेत्रात आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि एकतेसाठी महाराष्ट्राने काय केले हे सांगायच माझा छोटासा प्रयत्न!!

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcome

Website counter

Followers

Blog Archive

Contributors