Twitter

Follow palashbiswaskl on Twitter

Thursday, April 16, 2015

क्रांतिकारी मराठी अनियतकालिक ‘स्‍फुलिंग’चा एप्रिल 2015 अंक

क्रांतिकारी मराठी अनियतकालिक 'स्‍फुलिंग'चा एप्रिल 2015 अंक
http://sfuling.com/archives/234
प्रिय वाचक,
अतिशय गतिमान परंतु विषम विकासाच्या या काळात अनेक समस्यांनी आपले सामाजिक जीवन ग्रासले आहे. गुंतागुंतीच्या परिस्थितीमुळे या समस्यांची सोडवणूक अधिकाधिक कठिण बनते आहे. अशा वेळी सर्वच क्षेत्रांमध्ये सशक्त आणि समृद्ध वैचारिक लढे उभारणे नितांत गरजेचे आहे हे कोणीही विचार करणारी व्यक्ती सहजच समजू शकते. याच उद्देशाने 'स्फुलिंग' हे अनियतकालिक आम्ही सुरू केले असून कोणत्याही प्रकारचे सरकारी आर्थिक साहाय्य अथवा उद्योजक-व्यापाऱ्यांच्या मदतीच्या कुबड्या न घेता पूर्णपणे सुजाण वाचक आणि प्रागतिक विचारांशी बांधिलकी राखणाऱ्या व्यक्तींच्या बळावर हे अनियतकालिक चालविण्याचा आमचा संकल्प आहे.
एप्रिल २०१५ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या 'स्फुलिंग'च्या दुसऱ्या अंकाची ई-कॉपी आपणास पाठविताना आम्हांला आनंद होत आहे. या अनियतकालिकाचा हेतू जपण्यासाठी तसेच पुढच्या वाटचालीसाठी आम्हांला अधिकाधिक लोकांच्या सहभागाची, त्यांच्या सूचनांची गरज आहे. 'स्फुलिंग'च्या या अंकावर आपली प्रतिक्रिया तसेच पुढच्या अंकांसाठी आपल्या सूचना जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.
या अनियतकालिकाची सदस्यसंख्या वाढविण्यासाठी तसेच ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण त्याचे सदस्यत्व घेणे व आपल्या मित्रांनाही देणे आवश्यक आहे. आपण या अनियतकालिकाची हार्ड कॉपी आपल्या घरी मागवू इच्छित असाल तर आपण आपला पत्ता आम्हांस जरूर कळवावा.
'स्फुलिंग'चे सदस्यत्व मूल्य चार अंकांसाठी रु. १०० व आठ अंकासाठी रु. २०० एवढे निश्चित करण्यात आले आहे. आमची आपणांस विनंती आहे की स्फुलिंगची ई-कॉपी पूर्णपणे मोफत उपलब्ध असली तरीही हे अनियतकालिक सुरळीत चालविता यावे याकरिता आपण त्याचे सदस्यत्व घ्यावे तसेच आर्थिक सहकार्यसुद्धा करावे. 'स्फुलिंग'चे नियमित वाचक बनून आपणही या वैचारिक मोहीमेत आमच्यासोबत सामील व्हावे, असे आमचे आपणास नम्र आवाहन आहे.
सदस्यत्व मूल्य जमा करण्यासाठी बँक खाते विवरण.
खातेधारकाचे नाव - नारायण खराडे
बचत खाते क्र. ०१९८००१०१०१९८१४,
कॉर्पोरेशन बँक, म्हापसा शाखा
आईएफएससी कोड - CORP0000198

संपादकीय कार्यालय : रुम नं. ७, धनलक्ष्मी कोऑ. हाउसिंग सोसायटी, प्लॉट नं. बी- १६, सेक्टर १२, खारघर, नवी मुंबई - ४१०२१०
मो.क्र.- ९७६९९०३५८९,९६१९०३९७९३
ईमेल - sfuling.mag@gmail.com
वेबसाइट - www.sfuling.com

आपल्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत,
क्रांतिकारी अभिवादनासह,

नारायण खराडे,
संपादक, 'स्फुलिंग'

अंतरंग

संपादकीय
चांगल्या दिवसांचे वास्तव आणि पर्यायाचा सवाल

प्रासंगिक
महाराष्ट्रात कामगार हितांवर घाला
दिल्ली मध्ये 'आम आदमी पक्षा'चा विजय आणि कष्टकरी जनतेसाठी काही धडे

समाज
भारतीय विज्ञान परिषद – वैज्ञानिक तर्कपद्धतीचे श्राद्ध घालण्याची तयारी
जवखेड दलित हत्याकांडाने पुन्हा उघडकीस आणले व्यवस्थेचे वास्तव
ढंढारी बलात्कार आणि हत्या प्रकरण – सामाजिक वास्तावाचे दर्शन

मीडिया
कॉर्पारेट भांडवली प्रसारमाध्यमांचे वर्चस्व आणि क्रांतिकारी वैकल्पिक प्रसारमाध्यमांसमोरील आव्हाने

आरोग्‍य
नफाखोर व्यवस्थेत प्रभावहीन ठरताहेत जीवन-रक्षक औषधे

जगाच्‍या पाठीवर
अमेरिकन सत्ताधाऱ्यांच्या पापाचे ओझे वाहते अमेरिकन सैनिक
'फॉक्सकॉन'च्या कामगारांचे नारकीय जीवन

इतिहास
युद्धखोर साम्राज्यवादाचे सिंहावलोकन

घडामोडी
सांप्रदायिक फासीवाद्यांचे जनतेत फूट पाडण्याचे प्रयत्न हाणून पाडा

सिनेमा
'गांधी'कार रिचर्ड अ‍ॅटनबरो यांना खुले पत्र

श्रद्धांजली
प्रा. तुलसीराम यांना 'स्‍फुलिंग'ची श्रद्धांजली
कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या बलिदानानंतर…

साहित्‍य
कात्यायनी यांच्या निवडक कविता
किचाट – सुदेश जाधव यांची कथा
एका कामगाराच्या कविता
उद्धरण

चांगल्या दिवसांचे वास्तव आणि पर्यायाचा सवाल महाराष्ट्रात कामगार हितांवर घाला दिल्ली मध्ये 'आम आदमी पक्षा'चा विजय आणि कष्टकरी जनतेसाठी काही धडे जवखेड दलित हत्याकांडाने पुन्हा उघडकीस आणले व्यवस्थेचे वास्तव कॉर्पारेट भांडवली प्रसारमाध्यमांचे वर्चस्व आणि क्रांतिकारी वैकल्पिक प्रसारमाध्यमांसमोरील आव्हाने…
Like · Comment · Share

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcome

Website counter

Followers

Blog Archive

Contributors