Twitter

Follow palashbiswaskl on Twitter

Tuesday, June 23, 2015

मध्य रेल्वेचा खोळंबा सुटला, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

मध्य रेल्वेचा खोळंबा सुटला, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

मध्य रेल्वेचा खोळंबा सुटला, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

मुंबई : मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाची हजेरी आहे. काल पावसाची विश्रांती होती. मात्र पहाटेपासून पुन्हा जोरदार सरी कोसळतायत. पश्चिम उपनगरासह कल्याण, डोंबिवलीतही दमदार पाऊस पडतोय. हिंदमाता, सायन, चेंबुर, मिलन सब वे भागातील सखल भागात पाणी साचलंय. दरम्यान, हार्बर आणि मध्य रेल्वेच्या लोकल १० मिनिटं उशिरानं धावत आहेत.

सकाळी ११.०० वाजता
दादरच्या आगर बाजार परिसरात झाड कोसळून एकाचा जागीच मृत्यू... दोन जण गंभीर जखमी 

सकाळी १०.३० वाजता
ठाण्यात कळवा ब्रीजजवळ पाणी साचलंय. त्यामुळे ठाण्याहून नवी मुंबईला जाणाऱ्यांनी ऐरोलीमार्गे जावं

सकाळी १०.१६ वाजता 

मध्य रेल्वेवर दादर स्टेशनजवळचा खोळंबा सुटला... तुटलेल्या ओव्हरहेड वायरचं काम पूर्ण... वाहतूक लवकरच पूर्ववत होण्याची शक्यता

सकाळी ९.३० वाजता
मुंबई शहर परिसरात ३८.३९ मिमी, पूर्व उपनगरात ४९ मिमी तर पश्चिम उपनगरात ५३ मिमी पावसाची नोंद झालीय. संध्याकाळी ५ वाजता समुद्रात ३.७६ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळं समुद्रात पोहण्यास जाऊ नका, असं आवाहन 'झी मीडिया' करतंय. 

सकाळी ९.०० वाजता
मुंबईत आज काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. दिवसभर हवेचा वेगही जास्त राहील.

सकाळी ८.३० वाजता 
सकाळापासूनच मध्य रेल्वेची स्लो ट्रॅकवरची वाहतूक वळवण्यात आल्यानं फास्ट ट्रॅकवरही गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलंय. सकाळी सकाळी वाहतूक खोळंबल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. 

सकाळी ७.१५ वाजता 
दादर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक-३ वर ओवरहेड वायर तुटलीय.  त्यामुळे मध्य रेल्वेच्या सीएसटी अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. विद्याविहार ते माटुंगा दरम्यान स्लो वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आलीय. 

आधीच पावसानं खोळंबा केलाय. त्यात ओव्हरहेड वायर तुटली... लोकल उशिरानं धावत असल्यानं कार्यालयाच जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत.  

सकाळी ७.०० वाजता
पहाटेपासून मुंबईत दमदार पाऊस पडतोय. दादर परीसरात सखल भागात पाणी साचलंय.

http://zeenews.india.com/marathi/news/mumbai/live-rain-update-23-june-2015/277633

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcome

Website counter

Followers

Blog Archive

Contributors