Twitter

Follow palashbiswaskl on Twitter

Wednesday, February 20, 2013

बंद भारतात संमिश्र, मुंबई सुरळीत

बंद भारतात संमिश्र, मुंबई सुरळीत


वाढत्या महागाईच्या प्रमाणात पगारामध्येही वाढ व्हावी कंत्राटी कामगारांनाही किमान वेतन ठरवून द्यावे ,खासगीकरणाचा सपाटा बंद करावा आदी मागण्यांसाठी देशातील कामगार संघटनांनी पुकारलेला दोनदिवसांच्या देशव्यापी संप सुरू झाला आहे उत्तर भारतातील तसेच काँग्रेसेतर सरकारांच्या राज्यांमध्ये यासंपाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे मुंबईत मात्र महत्त्वाच्या संघटनांनी अंग काढून घेतल्याने अपवादवगळता सर्व वाहतूक व व्यवहार सुरळीत सुरू आहेत 

भारतीय मजदूर संघ इंटक आयटक सिटू एआयसीसीटीयू गोदी कामगार संघटना भारतीय कामगारसेना महासंघ औद्योगिक कामगार वीज कामगार परिवहन कामगार बँक विमा कर्मचारी संघटना ,केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी संघटना संपात सहभागी झाल्या आहेत त्यामुळे उत्तर भारतात संपाचा प्रभावकाहीसा जाणवत आहे डाव्यांची ताकद असलेल्या केरळ व पश्चिम बंगालमध्ये तसेच बिहारमध्येही संप रेल्वे व रस्ते वाहतुकीवर संपाचा परिणाम झाला आहे. 

मुंबईत मात्र दैनंदिन सेवांशी संबंधित असलेल्या बेस्ट महापालिका रिक्षा व टॅक्सी संघटनांनी संपातूनमाघार घेतल्यामुळे संप निष्प्रभ ठरला आहे बहुतांश रिक्षा टॅक्सी नेहमीप्रमाणे रस्त्यावर धावत आहेत .तर शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कॉलेज संघटना शिक्षक परिषद आणि संस्थाचालकसंघटनांनीही संपातून अंग काढून घेतल्याने शाळा कॉलेजही सुरळीत सुरू आहेत 

शिवसेनाप्रणीत युनियनच्या रिक्षा टॅक्सीचालक व बेस्ट कामगार सेना संपात उतरले असले तरी त्यांचीताकद अगदीच मर्यादित असल्याने वाहतुकीवर परिणाम झालेला दिसत नाही शिवसेनेची युनियनअसलेल्या छोट्या मोठ्या कंपन्या हॉटेल्स व विमानतळावरील कंपन्यांवरच संपाचा थोडाफार परिणामझाल्याचे दिसत आहे 

लोकल ट्रॅकवर 

लोकल सेवा ठप्प करण्याची क्षमता असणाऱ्या रेल्वे संघटनांनीही मवाळ भूमिका घेतल्याने पश्चिम मध्यआणि हार्बर मार्गावरील लोकल सुरळीत सुरू आहेत 

एटीएमपुढे रांगा 

देशातील सार्वजनिक खासगी विदेशी सहकारी बँकांच्या ९० हजार शाखांमध्ये काम करणारे १० लाखकर्मचारी संपात सहभागी झाल्याने अपेक्षेप्रमाणे बँकांमध्ये शुकशुकाट आहे त्यामुळे पैसे काढण्यासाठीशहरातील एटीएमच्या बाहेर रांगा लागल्या आहेत 


हरयाणात हिंसक वळण कामगार नेत्याचा मृत्यू 

देशव्यापी संपात सहभागी झालेल्या हरयाणा रोडवेज वर्कर्स युनियनच्या एका नेत्याचा आज अंबाला येथेमृत्यू झाला अंबाल डेपोतून बाहेर पडणाऱ्या बस रोखण्याच्या प्रयत्नात बसची धडक लागून तो जागीच ठारझाला या घटनेनंतर संतप्त झालेल्या कामगारांनी प्रशासनावर हत्येचा आरोप करत पोलिसांच्या गाड्यांचीतोडफोड केली हरयाणा रोडवेजच्या महाव्यवस्थापकाविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला जावा अशी मागणीकामगारांनी केली आहे तोपर्यंत मृतदेहाला कोणी हात लावणार नाही असा इशारा कामगारांनी दिला आहे .

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcome

Website counter

Followers

Blog Archive

Contributors