Twitter

Follow palashbiswaskl on Twitter

Sunday, June 28, 2015

"पुरोगामी महाराष्ट्रात शाहू जयंती दिनी दलित अत्याचार"

"पुरोगामी महाराष्ट्रात शाहू जयंती 


दिनी दलित अत्याचार"


पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातिल शेवटच्या टोकावर लाखेवाडी हे एक छोटंसं गाव आहे या गावामध्ये मातंग समाज कमी प्रमाणात राहतो आहे जातिवादाचा कायमचा डाग लागलेला हा परिसर कु प्रसिद्ध आहे १९७२ मध्ये बावडा दलित बहिष्कार प्रकरण देशभर गाजलं होतं.त्यामध्ये माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे वडील शहाजिराव बाजीराव पाटील यांना सक्त कारावासाची शिक्षा झाली होती.
तसेच गेल्या तिन वर्षापूर्वी चन्द्रकांत गायकवाड नावाच्या जांभ येथील दलित कार्यकर्त्याची गोळ्या घालून ह्त्या करण्यात आली होती.१५ऑगस्ट२०१० मध्ये निरानरसिंहपुर येथील दलित वस्तीवर भ्याड हल्ला झाला होता.असाआहे इंदापूर तालुक्यातील दलित अत्याचाराचा थोडक्यात इतिहास
अशा अनेक घटना घडत असतात पण काही दलित चमचां मार्फत जातीयवाद्यांच्या ताकदीची भीती घालून प्रकरण दडपली जातात आणि आवाज दाबला जातो हे त्रिवार सत्य 
लाखेवाडी मध्ये एका शेतामध्ये भिंगारदिवे आड़नावाचं दलित कुठुंब आपल्या शेतामध्ये शेती करून उदरनिर्वाह करुण आपली उपजीविका करत आहे.
खेडोपाडी एखादया दलिताकडे सहा एकर जमीन असने म्हणजे या भागात गुन्हाचं आहे
दलितानी आमच्या शेतात राबावं आमची गुलामगिरी करावी ही जातीयवाद्यांची मानसिकता आहे.दलिताने जमीन आम्हाला विकावी आणि त्याने भूमिहीन होउन आमची गुलामी करावी अशी सवर्ण समाजाची तीव्र मानसिकता आहे म्हणून गेल्या अनेक वर्षापासून भिंगारदिवे कुठुंबा वर शिंगाडे व इतर बांधकरी नको नको ते हतकंडे वापरून भिंगारदिवे कुठुंबाने जमीन विकावी असा शिंगाडे व इतरांचा मानस आहे.त्या दृष्टीकोनातुन कोणत्या ना कोणत्या कारणाने भांडन काढने सार्वजनिक हातपंपावर पानी भरण्यास मज्जाव करने, रस्त्यावर काटे टाकने,लहान मुले शाळेत जात असताना त्यांच्या अंगावर गाडी घालून भीती घालने,लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करने असे प्रकार करूनही दलित कुठुंब शेती विकत नाही.म्हणून शेळगाव येथील २०ते२५ गुंड पैलवान भाड्याने आणून काल सायं पाच वाजता दलित कुठुंबावर भ्याड हल्ला केला त्यामध्ये सहाजन गंभीर जख्मी असून त्यांचेवर उपचार चालु आहेत.

कोनाला या प्रकरणा बद्दल माहीत हवी असल्यास 
पी.आय.शिंदे मो.9923052999 क्रमांकावर कॉल करून घडलेल्या प्रकाराचा जाब विचारा....

आपला
सुनील झेंडे
बहुजन समाज पार्टी
इंदापूर विधानसभा
मो.9545574414
9421079693
7841075561

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcome

Website counter

Followers

Blog Archive

Contributors