Twitter

Follow palashbiswaskl on Twitter

Thursday, May 29, 2014

विद्रोही व नक्षलवादी यांच्यातील सीमारेषास्पष्ट करणारा निकाल मधु कांबळे, मुंबई

विद्रोही  नक्षलवादी यांच्यातील सीमारेषास्पष्ट करणारा निकाल

मधु कांबळेमुंबई
Published: Friday, May 23, 2014

कार्ल मार्क्माओ किंवा जगातील इतर राजकीय-सामाजिकविचारवंतांची पुस्तके जवळ बाळगणेत्यांच्या विचारांचाअभ्यास करणेत्याचे समर्थन करणे वा त्यांचा प्रचार-प्रसारकरणे एवढय़ावरून कुणी दहशतवादी किंवा बंदी घातलेल्यामाओवादी संघटनेचे सदस्य ठरू शकत नाहीतअसा अतिशयमहत्त्वाचा निकाल गोंदिया सत्र न्यायालयाने दिला आहेविद्रोहीचळवळ आणि िहसात्मक मार्गाचा अवलंब करणारी माओवादीकिंवा नक्षलवादी चळवळ यांच्यातील सीमा रेषा स्पष्ट करणारा हानिकाल आहेविदर्भातील कोहमारा ते खडकी बामनी यादरम्यान गस्तीवरअसलेल्या पोलिसांनी २६ डिसेंबर २०१० रोजी एक मारुती ओम्नीगाडी अडवली  त्यातील पाच जणांना अटक केलीत्यांच्याकडेरोकडनकाशेकागदपत्रेपुस्तकेचिठ्ठय़ा सापडल्या होत्या.त्यावरून त्यांना बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे सदस्यठरवून त्यांच्यावर खटला भरला होतात्यानंतरच्या तपासाच्याआधारावर ठिकठिकाणी टाकलेल्या छाप्यांनंतर एकूण नऊजणांना अटक झाली होतीआरोपींचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे पुरावे म्हणून वाहनातून त्यांच्या घरांतून हस्तगत केलेली पुस्तकेप्रसिद्धी पत्रकेसीडी,पेन ड्राइव्हसंगणकलॅपटॉप  त्यांतील माहिती पोलिसांनीसादर केली होतीपंचनामेसाक्षी आणि आरोपींची बाजू ऐकूनघेतल्यानंतर पोलिसाचे पुरावेसाक्षीदार आणि पंचनामे हा साराचमामला संशयास्पद आहेअसे न्यायालयाने स्पष्ट म्हटले.मुंबईत सुधीर ढवळे यांच्या घरातून पोलिसांनी मार्क्माओडॉ.आंबेडकरांसह काही विचारवंतांची पुस्तके हस्तगत केलीइतरआरोपींकडूनही असेच साहित्य जप्त झाले  एवढय़ावरून त्यांनामाओवादी ठरविण्यात आलेया पुस्तकांवर कुठेही बंदी नाहीमगती जवळ बाळगली वा वाचली म्हणून कुणी दहशतवादी ठरतनाहीकिंबहुना त्या पुस्तकांमधील विचार हेच आरोपींचेही विचारआहेतअसे सिद्ध करता येत नाहीअशी पुस्तके बाळगली म्हणूनत्यांना दहशतवादी ठरवायचे तर मग त्यांच्या मूळ लेखकांनाहीआरोपी ठरवावे लागेलअसे न्यायालयाने म्हटले आहेनक्षलवादाच्या प्रश्नावरीस सरकारच्याच एका अभ्यास समितीनेसमाजातील गरीब वर्गाला राजकीयसामाजिकआर्थिक सांस्कृतिक विषमतेला तोंड द्यावे लागतेअसे म्हटले आहेसभा,मेळावेपरिषदा भरवून समाजातील विचारवंत  कार्यकर्ते हे प्रश्नसोडविण्यासाठी चळवळ करतातत्यांची कृती सरकारलादहशतवादी कशी वाटतेअसा सवाल न्यायालयाने उपस्थित केलाआहेदेशाच्या काही भागांत अलीकडे दहशतवादी कारवायांमुळे गंभीरपरिस्थती निर्माण झाली आहेकेंद्र सरकार राज्य सरकारांच्यामदतीने अशा भागांत विकास कामे करून नक्षलवादी कारवायांनाआळा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत्यासाठी त्यांनी नक्षलग्रस्तभाग या ऐवजी डावी कडवी विचारसरणीग्रस्त भाग असे नामांतरकेले आहेपरंतु भ्रष्टाचारसामाजिक विषमतागरिबीया विरुद्धबोलणे गुन्हा ठरू शकत नाहीनक्षलवादाशी संबंध जोडून ज्यांनाअटक केली ते पथनाटय़ाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांबाबतजनजागृती करतातत्यांनी कुठेही दहशतवादी संघटनेच्यामदतीसाठी बैठक घेतलेली नाहीइतरांना त्यासाठी प्रवृत्त केलेलेनाहीशस्त्रेस्फोटके बाळगलेली नाहीतत्यामुळे त्यांना बंदीघालेल्या माओवादी संघटनेचे सदस्य ठरविता येत नाहीअसेन्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcome

Website counter

Followers

Blog Archive

Contributors